– पल्लवी त्रिभुवन
महाराष्ट्राचे विचारगर्भ कवी व प्रसिद्ध मराठी साहित्यिक माननीय फ .मु शिंदे यांची यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून त्यांचे शालेय जीवन व अनुभव या विषयी मत व्यक्त केले.
फ .मु शिंदे यांनी सालेगाव, रुपुर (हिंगोली )येथे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले .पुढे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळमनुरी येथे त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये किरायाने रूम घेऊन चुलीवर स्वयंपाक करून एकटे राहून पूर्ण केले.
फ मु शिंदे यांच्या जीवनातील शिक्षक —
फ.मु. शिंदेजींना खूप चांगले शिक्षक मिळाले असे ते सांगतात. देवजी बलखंडे नावाचे खूप चांगले शिक्षक त्यांना मिळाले .गणित व इंग्रजी अप्रतिम शिकवत असत. फ .मु शिंदेना गणितामध्ये आणि इंग्रजी मध्ये 100 पैकी 98 गुण मिळाले .तरी दोन गुण कुठे गेले हे ते शोधत असतात व शिक्षक यांना poor performance म्हणत असे असे ते गमतीने सांगतात .पाचवी ते दहावीपर्यंत खूप कष्ट करून ते शिकले ते म्हणतात की, कष्टातून प्रतिभा फुलते दरवर्षी वर्गात फ. मु शिंदे जी पहिली यायचे. मराठवाड्यात पहिल्या दहा हुशार मुलाखत यांचा समावेश होत असे. त्यांचे शिक्षक देवजी बलखंडे सर यांच्यावर लिहिलेली कविता त्यांनी सादर केली. ज्यात त्यांच्या विचार भावना आहे.
स्पर्शातून
विसर सीमेवरून आठवत
आठवत येत आहे
मास्तर तुम्ही जोडलेले
वर्तुळ कुठे आहे
अस्ता भोवती पालवताना मन तुमच्या मास्तर उभाच आहे रेषा भागाकाराचा वेशीच्या तुम्ही एक अधिक एक शिकवलं मास्तर मला तुम्ही तुमच्यात मिळवलं येता जाता ठेच लागायची होता तुम्ही वेशीबाहेर आमचं मन आमचं आनंदा तुमचं घर काटे कुरवळणारी पिकलेली बोर
झेलणारी वांझ चिंच, मोबदल्यात मिळालेली भाकरी मास्तर कुठून यायचे लाल मुंग्या मोबदला टोकरायला, चिलमीला कधीच नाही छपीची लुंगी लावली, मास्तर सारेच होती का प्रतीक जगण्यातली, हाडांनी सांधलेलीतुम्ही एक आकृती होतात ,माणूस होता ,नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता, तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी ,अजूनही कळत मास्तर तुम्ही अस्पृश्य कसे होता, माझ्या युगात मी तरंगत असताना, प्रवेश करून तुम्ही तुमच्या जगण्याच्या विकल गावात कशासाठी घेतला लपेटून ,मास्तर का हरवलं क्षितिज भुईला झुकवून, मास्तर हे धावताच प्रश्न पृथ्वीसारखे, आगगाडी थांबेल ?कीतेव्हा ही धावतील का सारखे, होत आहेत आता मुक्तसंवाद आकाश मातीची पण नालंदा कुठे आहे ,चिंचेचं, बोरीचं मूळ आहे, मास्तर तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठे आहे.
असं त्यांचं शिक्षकांविषयी प्रेम या कवितेतून दिसून येत. इतर शिक्षक सुद्धा त्यांना खूप चांगले मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने ते शिकवत असत .शाळेत असताना फारुकी नावाचे या इंग्रजी शिक्षकांना त्यांनी दाखवली आणि ते बघून त्यांची इंग्रजीचे शिक्षक आश्चर्यचकित झाले. किती सुंदर कविता अशी रचना ते कुठून शिकले .तेव्हा ते पुस्तकात ज्या पद्धतीने कविता यायच्या .त्या बघून मी लिहीत असे. त्यांच्या शिक्षकांना खूप आनंद वाटला. मराठी विषय यादवराव मुळे या नावाची शिक्षक शिकवत असत. आणि अगदी उत्तमरित्या ते शिकवत. सोनबा राव पवार गणित उत्कृष्ट शिकवत असे. त्यांच्या शिक्षकांविषयी कौतुकाने भारावून सांगतात.
गरिबीतही जगण्याची श्रीमंती टिकवण्याचे संस्कार असावेत—
फ .मु शिंदे यांनी विद्यार्थीदशेत असताना अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगले व आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या जगण्यातील स्वाभिमान कष्टातून फुलवावा आणि म्हणून त्यांच्या आईने दिलेली ही शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली.
आईची शिकवण–
फ मु शिंदे यांची आई अशिक्षित होती घरात कोणी शिकलेले नव्हतं पण त्यांच्या आईला तळमळ होती की, त्यांनी खूप चांगलं शिकावं पण त्यांना शिक्षणाचे महत्त्व खूप चांगलं माहिती होतं .आपल्या लेकरासाठी त्यांच्या आईने अनंत कष्ट हालअपेष्टा सहन केले .व फ .मु शिंदे सरांना शिकवण दिली की, तेथे संघर्ष करण्याचे प्रसंग येईल तिथं तिथं त्याच धाडसाने तोंड दिलं पाहिजे. ही जगण्याची श्रीमंती टिकवली पाहिजे .त्यांच्या घरात ते पहिले शिक्षक व्यक्ती होते. आईवडिलांनी मुलाला खूप चांगलं शिकवलं संस्कार दिले .व फ.मु .जी मला गणेशराव दुधगावकर या मित्राच्या उल्लेख करायला विसरत नाही की, ज्यांनी या शिक्षणामध्ये त्यांना सहकार्य केले होतं त्यांचे परम मित्र होते.
आजची शिक्षण पद्धती सूक्ष्म स्वरूपाची–
आधीच्या आणि आताच्या शिक्षण पद्धती विषयी विषयी प्रश्न विचारला असता ,फ. मु शिंदे म्हणाले की ,आमच्या वेळी शिक्षण हे खूप स्थूल स्वरूपात होतं आणि आता त्याचं स्वरूप सूक्ष्म स्वरूपात झाल आहे .परंतु त्यावेळीहीशिक्षण अवघड होतं आणि आताही अवघडच आहे. शिक्षकांविषयी फ.मु.जी म्हणतात की,आमच्या वेळी चांगले शिक्षक होते .तसे आजही चांगले शिक्षक आहेत. कष्टाळू शिक्षक आहे प्रेरणा देणारे शिक्षक आहेत. आजचा अभ्यासक्रमही अवघड आहे आणि त्यावेळी ही अवघड होता. कालमानानुसार अभ्यासक्रम बदलतात कारण त्याच्या गरजा ह्या आव्हानात प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतात.
विद्यार्थ्यांना प्रेरणा व उर्मी आतूनच असावी लागते—
सरते शेवटी कवी फ. मु शिंदे जी विद्यार्थ्यांना सांगतात की, कष्ट व शिक्षण घेण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांना आठवण येत असावी लागते. त्या उर्मिला आणखी फुलवत जावं, बाह्य घटक फक्त मदत करतात. आजही विद्यार्थी अभ्यास प्रवण आहे .अभ्यासाकडे ते आत्मीयतेने बघतात .बारकाईने बघतात. कष्ट करतात .आपल्या आतल्या उर्मिला फुलवत आपला विकास करावा. स्वतः मधील उर्मी ओळखून वाटचाल करावी .जीवनात यश मिळवावे फ.मु शिंदे जी सांगतात .